रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 7 डिसेंबर 2024 (18:33 IST)

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर विरोधकांचा हल्लाबोल

Aditya Thackeray
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली विरोधकांनी हल्लाबोल करत अधिवेशनावर बहिष्कार केला. शिवसेनेचे युबीटीचे नेते आदित्य ठाकरे हे कार्यकर्त्यांसह विधानभवनाच्या संकुलात पोहोचले. 

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही आज शपथविधी वर बहिष्कार टाकला असून ईव्हीएमचा वापर करत लोकशाहीची हत्या केली जात असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जनतेचा आदेश नसल्याचे ते म्हणाले. 
हा आदेश निवडणूक आयोगाचा आहे.
सोलापूरच्या मरकडवाडीमध्ये लोकांना बॅलेट पेपरवर मतदान करायचे होते पण प्रशासनाने मतदान करू दिले नाही.आता प्रशासन तिथल्या लोकांना अटक करत आहे. आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विरोधकांनी या ठिकाणी असे आरोप करण्यात काही अर्थ नाही. विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे जावे तेथे न्याय न मिळाल्यास त्यांनी न्यायालयात जावे.
Edited By - Priya Dixit