गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जून 2024 (09:36 IST)

शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या क्लिनचिट ला विरोध

ajit panwar
शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांना क्लिनचीट देण्यात आली. परंतु अजित पवारांच्या क्लिनचीट ला विरोध ईडी कडून करण्यात येत आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दखल केला. 

कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार आणि बँकेतील 80 कर्मचाऱ्यांना क्लिनचीट देण्यात आली. या क्लिनचीटचा विरोध करण्यासाठी ईडी कडून मध्यस्थी अर्ज दाखल करण्यात आला असून अजित पवार यांचे नाव आरोपींच्या यादीत असल्याचे म्हटले आहे. 

या प्रकरणात काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शहाणे 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यात न्यायालयात क्लोजर अहवाल सादर केला या मध्ये साखर कारखाने कर्जवाटप विक्रीमुळे बँकेला कोणतं ही नुकसान झालं नसून पुरावे ही नसल्याचे म्हटलं होत. या प्रकरणी ईडीने विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या क्लोजर अहवालामुळे आमच्या तपासावर परिणाम होण्याचे ईडीचे म्हणणे आहे.   

ईडीच्या या अर्जावर लवकर सुनावणी केली जाणार आहे. या अर्जामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  
 
Edited by - Priya Dixit