रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी
राज्यात विविध जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीय. आज पहाटेपासूनच मुंबई शहर उपनगरात आणि कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत पुढील काही तासात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. तर कोकणात रत्नागिरीत,गुहागर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. चिपळून, मंडणगड,दापोली संगमेश्वर,राजापूरलाही दमदार पावसाने झोडपून काढले आहे. तर रोहा,कोलाड,पाली आणि सुधागडमध्येही जोरदार पाउस आहे. रत्नागिरीत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु होती. मात्र काल रात्री पासून पावसाचा जोर वाढलेला पहायाला मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. रत्नागिरीतील दापोली,मंडणगडमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. दापोली,मंडणगडमधील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तर कोकणातील सर्व समुद्रांना उधाण आल्याचे दिसून येतेय. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या संपूर्ण परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. आज ऑरेंज अलर्ज जारी करण्यात आला असला तरी लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.