बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2019 (09:20 IST)

अध्यादेश काढला असून, आता प्रतीक्षा अधिसूचनेची

राज्य सरकारने वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणातील मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेश कायम करण्यासाठी अध्यादेश काढला असून, तो राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला आहे. या अध्यादेशावर स्वाक्षरी झाल्यानंतरच सरकार त्याची अधिसूचना काढणार आहे, पण या अध्यादेशात नेमके काय आहे, याची माहिती अद्याप कोणालाच नसल्याने मराठा विद्यार्थी, खुल्या गटातील विद्यार्थी, पालक तसेच सीईटी सेल यांचे लक्ष लागून आहे.
 
एकीकडे हा अध्यादेश लागू झाल्यानंतर त्या संदर्भातील प्रवेश निश्चितीची सूचना सीईटी किंवा वैद्यकीय संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतरच मराठा आंदोलक विद्यार्थी आपले आंदोलन मागे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.