शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (08:17 IST)

९४ व्या साहित्य संमेलनात आनंद यात्रा कार्यक्रमाचे आयोजन

९४व्या साहित्य संमेलनात ४ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील कलावंताचा सहभाग असलेला कलावंताचा आनंद यात्रा हा कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे समन्वय सचिन शिंदे यांनी दिली.
आनंद यात्रा कार्यक्रमात नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील प्रातिनिधीक अशा दिवंगत साहित्यकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचे लेखन प्राजक्त देशमुख यांनी केले असून मार्गदर्शन दत्ता पाटील करत आहे. कार्यक्रमाचे दिग्दर्शन शिंदे व सहदिग्दर्शन विनोद राठोड करत आहे. या मध्ये साहित्य पंरपरा, शाहिरी परंपरा, नाट्यपरंपरा, सामाजिक परंपरा, कवी परंपरा, कथा-कांदबरी परंपरा, लोक परंपरा व चित्रपट परंपरा आदी प्रकारचे विभाग केले असून नृत्य, नाट्य व माहितीपटाच्या आधारे कार्यक्रम सादर होणार आहे. आनंद यात्रेत शहरातील १०० हून अधिक कलावंत सहभागी होणार आहेत. याशिवाय नाटक, कविता, काही प्रसंगाचा नाट्य अविष्कार सादर करणार आहे. नृत्य कलावंतांना आदिती पानसे, सुमुखी अथनी, कीर्ती भवाळकर, प्रदीप गोरडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.