शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (21:40 IST)

आमदार बच्चू कडूंनी घेतली अधिकाऱ्यांची ‘शाळा’

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिकच्या सिंचन विभागात आकस्मिक भेट देऊन झाडाझडती घेतली. यावेळी अनेक अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी काय निर्णय घेतात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.
 
या पूर्वीही आमदार बच्चू कडू यांनी विविध ठिकाणी भेट देऊन तिथल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. दरम्यान नाशिकला आल्यानंतर त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांचा ताफा नाशिक सिंचन विभाग कार्यालयाकडे वळवला. राज्यमंत्र्यांचा ताफा पाहताच अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात कडू यांनी हजेरी पुस्तक मागवून कोणते कर्मचारी अनुपस्थित आहेत, याची खातरजमा करून घेतली. यावेळी अनेक आअधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले. तर अनेक काम प्रलंबित ठेवल्याचं निष्पन्न झाल्याने अधिकाऱ्यांना यावर खुलासा करण्याचे सांगितले.त्याचबरोबर विभागातील अन्य कामकाजासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक कामात अनियमितता आढळल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली.