शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (21:33 IST)

म्हणून महाड एमआयडीसीतील पाणी पुरवठा बंद

रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे याचा फटका 18 गावांना बसणार आहे. पाणी प्रदुषणामुळे महाड नगर पालिका, एमआयडीसीसह अठरा गावांचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे.
 
महाड एमआयडीसीतील पाणी प्रदूषण झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पाणी प्रदुषीत असल्याचे पुढे आले. महाड नगरपालिका, एमआयडीसीसह 18 गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. बंधारा आणि पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलमध्ये काळ्या रंगाचं दुर्घंधीयुक्त प्रदूषित पाणी मिसळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
पंपींग स्टेशन, पाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि बंधारा स्वच्छ करण्याचं काम सुरु आहे.  सावित्री आणि काळ नदीच्या संगमावर एमआयडीसीने बंधारा बांधला आहे.  या ठिकाणीचे पाणी उचलून त्याचा पुरवठा महाड एमआयडीसीमार्फत केला जातो.  दोन दिवसांपूर्वी या धरण आणि जॅकवेलमध्ये काळ्या रंगाचे दुर्घंधीयुक्त प्रदूषित पाणी आल्याने महाड एमआयडीसीमार्फत होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.