तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न : टोपे
राज्यात सध्या दररोज तीन लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे, तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असं आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितलं.
राजेश टोपे म्हणाले, ”दररोज राज्यात ३ लाख लोकांचं लसीकरण होत आहे. खासगी ठिकाणं वाढवतो आहे व ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी, यासाठी आम्ही व्यवस्था करतो आहे. आता २० बेडेड हॉस्पिटलपर्यंत देखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे इथून पुढे आणखी जे जे लोकं लसीकरणाची मागणी करतील, सगळे अर्ज आम्ही पुढे पाठवून मंजुरी घेऊ, आम्हाला मोठ्याप्रमाणावर लसीकरण करायचं आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा. त्यामुळे लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष दिलेलं आहे.”
”गृहविलगीकरणात ज्यांना ठेवण्यात आलं आहे, त्यांच्यावर त्यांनी स्वतः देखील लक्ष द्यावं आणि अनेकजण सोसायटीमध्ये राहतात, तेथील पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्याव लक्ष ठेवावं. आमचे आरोग्य कर्मचारी देखील त्यांच्यावर ठेवून आहेत, त्यामुळे संसर्ग कसा टाळता येईल, या दृष्टीने आपण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत.” असं देखील टोपेंनी यावेळी सांगितलं.
हाफकीनमध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळावी. आम्ही तिथे १७ लाख डोस तयार करू शकतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे.आपली ८० टक्के असेल तर इतर ठिकाणी २०० टक्के आहे. कोविशील्डच्या २ डोसमध्ये ४५ ते ६० दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.” अशी माहिती टोपे यांनी दिली.