बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (18:34 IST)

कोरोनाच्या लसीकरणासाठी अनोळखी लिंकवर नोंदणी करू नका अन्यथा ...

सध्या कोरोनाविषाणूच्या प्रतिबंधकासाठी लोक ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी करत आहे. अशा परिस्थितीत काही भुरटे आणि फसवे लोकांनी या मध्ये देखील लोकांना फसविण्यासाठी मार्ग शोधून काढले आहे.

या लसीकरणाच्या नोंदणीची प्रक्रियांमध्ये देखील बरेच लोक अनधिकृत लिंक वर क्लिक करून नोंदणीची प्रक्रिया करून फसवणुकीला बळी पडत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण किंवा नोंदणीच्या प्रक्रियेत कोणत्याही अनोळखी आणि अनधिकृत लिंक वर क्लिक करू नका.नोंदणी  करण्याच्या पूर्वी संबंधित लिंक योग्य असल्याची खात्री करून घ्या. 

लसीकरण नोंदणीसाठी स्वतंत्र अशी कोणतीही लिंक पाठविली जात नाही.  
लसीकरणाच्या नोंदणीची प्रक्रिया खूप सोपी आहे. विहित लिंक वर जाऊन कोणीही व्यक्ती विहित निकषानुसार नोंदणी करू शकतो. वास्तविक आपण जेव्हा पहिला डोस घेता, त्याच वेळी आपल्याला दुसऱ्या डोस ची तारीख सांगितली जाते.  

पोलीस विभागाने नुकतेच या संदर्भात सावधगिरी बाळगण्यासाठी एक पत्र जारी केले आहे.त्यानुसार एका पोलीस कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्याला ही लिंक एका अज्ञात मोबाईल नंबर वरून आली होती. त्या व्यक्तीने त्यांना नोंदणी करण्यासाठी सांगितले, पोलिसकर्मी ने सांगितलेली नोंदणीची प्रक्रिया केल्यावर त्यांच्या खात्यातून मोठी रकम काढण्यात आली. नंतर त्यांना फसवेगिरी होण्याचे समजले.