शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (09:55 IST)

कोरोना काळात स्वतःला मानसिकदृष्टया निरोगी कसे ठेवाल

दिवसरात्र कोरोनाची भीती सर्वांच्या मनात आहे अशा परीस्थितीत सगळीकडे तेच वातावरण बघून वर्तमानपत्रात देखील त्याच बातम्या वाचून अस्वस्थता आणि चिडचिडे पणा वाढतो त्या मुळे मानसिक ताण देखील वाढत आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांमध्ये नकारात्मकता वाढत आहे. या वेळी पूर्णवेळ घरात राहून देखील शारीरिक व्यायाम देखील केला जात नाही जेणे करून तंदुरुस्तपणा  किंवा मानसिक शांतता प्राप्त होऊ शकेल.  
यामुळे व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट वाटत नाही. परंतु काही बदल करून आपण या सर्व समस्यांमधून बाहेर येऊ शकतो.
चला काही खास टिप्स जाणून घ्या जेणेकरुन आपण स्वत⁚ ला मानसिकदृष्ट्या निरोगी बनवू शकता.

*ध्यान - 
ध्यान आपल्याला मानसिक दृष्टया निरोगी राहण्यास मदत करतो, तर या मुळे नकारात्मक विचार देखील मनात येत नाही. जेणे करून आपण स्वतःला मानसिकदृष्टया निरोगी ठेऊ शकतो. तसेच या मुळे आपल्याला आराम देखील मिळेल. या साठी ध्यान करण्याची गरज आहे जेणे करून आपण स्वतःला या नकारात्मक विचारांपासून दूर ठेऊ शकतो. या नकारात्मक विचारांना स्वतःवर वर्चस्व गाजवू देऊ नका. ध्यान करण्याचे बरेच फायदे आहे. भावनिक स्थिरता होणं,आनंद वाढणे, मानसिक शांतता मिळणे समस्या कमी होणे .

* सोशल मीडिया पासून दूर राहा- 
आपण नकारात्मक विचारापासून दूर राहू इच्छिता, तर सोशल मीडिया पासून दूर राहा.कारण या वर दिवसरात्र त्याच बातम्या असतात.या मुळे आपण अस्वस्थ होऊ शकता. 

* एकटे राहू नका- 
स्वतःला मोबाईलच्या आहारी होऊ देऊ नका, आपल्या कुटुंबियांसह वेळ घालवा. एकटे बसून राहू नका, या मुळे मनात नकारात्मक  विचार येतात. आपला वेळ कुटुंबासह घालवा. 

* संगीत ऐका- 
असं म्हणतात की ताणतणावात संगीत हे बूस्टर म्हणून काम करतो. म्हणून संगीत ऐका. रात्री झोप येत नाही आणि वाईट विचार मनात येतात तर अशा वेळी संगीत ऐकावं. जेणे करून मन शांत होईल आणि वाईट विचार येणार नाही.