महाराष्ट्रात कोरोनाचा थैमान, रुग्णांच्या आकड्यांनी 25 हजाराचा टप्पा ओलांडला
राज्यात कोरोनाने उच्छाद मांडला असून गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांची नवीन नोंद झाली असून आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 हजार पेक्षा वर झाली आहे. तब्बल 12 हजार रुग्ण बरे होऊन 58 रुग्ण दगावले आहे. हा आजवरचा सर्व जास्त उच्चांक असल्याची नोंद झाली. कोरोनाने सर्वत्र उच्छाद मांडला असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सध्या कोरोना सक्रिय प्रकरणे दोन लाख झाली आहे. राज्यात सध्या 1 लाखाहून जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सध्या राज्यात कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचे सांगितले जात आहे. काल कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजाराहून अधिक होती. आज 24 तासात आकड्यांनी उच्चांक गाठला असून आता संख्या 25 हजार 833 झाली आहे. या साठी बंद झालेली कोविड सेंटर्स पुन्हा कार्यरत करण्याचे समजले आहे.सध्या राज्यात 8 लाख 13 हजार कोरोनाबाधित रुग्ण गृह विलगीकरण मध्ये आहेत. तर 7 हजार रुग्णांना कोविड सेंटर्स मध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती या शहरातील आकडे चिंता जनक असून या ठिकाणी कोरोनाचे प्रकरणे झपाट्याने वाढत आहे. या साठी मुख्यमंत्र्यानी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाची वाढती शृंखला थांबवावी असे ही आवाहन नागरिकांना केलेले आहे.