1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (22:27 IST)

महाराष्ट्रात कोरोना अनियंत्रित 24 तासात 23 हजाराहून अधिक प्रकरणे

More than 23
आज महाराष्ट्रात सर्वाधिक 23 हजारहुन अधिक नवीन कोरोनाबाधितांची प्रकरणे नोंदली गेली. बऱ्याच जिल्ह्यात प्रतिबंध आणि रात्रीचा कर्फ्यू जाहीर करून देखील महाराष्ट्रात प्रकरणे थांबत नाही. महाराष्ट्र सध्या  कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. गेल्या आठवड्यात केंद्राची टीम कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यात पोहोचली होती. या टीमने दिलेल्या माहितीच्या आधारे सचिवांनी राज्य सरकारला पत्र लिहिले. केंद्राने राज्यात खबरदारीमध्ये दुर्लक्षितपणा आणि कमकुवत यंत्रणा नमूद केली.  
कोरोना विषाणूंच्या वाढत्या घटनांमुळे या वेळी केंद्र आणि राज्यसरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आता त्या राज्यात देखील कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहे ज्या राज्यात आतापर्यंत कमी प्रकरणे होती.  
याच अनुक्रमात पंजाब,गुजरात, कर्नाटक,आणि राजधानी दिल्ली मध्ये देखील प्रकरणे वाढत आहे.