गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (15:56 IST)

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोना

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुलाबराव पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनी ही माहिती दिली. गुलाबराव पाटील यांची प्रकृती ठिक असून मुंबईत रुग्णालयात उपचार घेत आहेत. संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
 
दरम्यान, जळगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष लक्ष घातले होते. त्यांच्याशी अनेक लोकांचा संपर्क आला आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने अनेकांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.