1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Modified शुक्रवार, 19 मार्च 2021 (08:30 IST)

निबंध कोरोना विषाणू कसा पसरतो, या वर उपाय काय आहे जाणून घ्या

कोरोना विषाणू असा संसर्गजन्य आजार आहे ज्याला who ने साथीचा रोग म्हणून जाहीर केले आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये हे चीनच्या लॅब मधून सोडण्यात आले होते, हळू‑हळू हा विषाणू एका माणसा पासून दुसऱ्या माणसा पर्यंत पसरत गेला आणि बघता बघता या विषाणूने संपूर्ण जगात आपले पाय पसरवून आपले विकट आणि विक्राळ रूप जगाला दाखविले.  
अंटार्क्टिकासारख्या भागातही कोरोनाची पुष्टी झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये हा विषाणू भारतात सापडला. 21 मार्च 2020 रोजी देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला, 1 वर्षानंतर म्हणजे 2021 मध्ये पुन्हा कोरोना विषाणू वाढत आहे.
कोरोना व्हायरस रोग म्हणजे काय
 
कोरोना विषाणू हा एक संसर्ग आहे जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जलद हस्तांतरित होतो. सध्या या विषाणूची लक्षणे थंडी, सर्दी, ताप, सुगंध न येणे, चव नसणे, श्वास लागणे आणि घशात दुखणे आहे.या विषाणूवर जगभरात संशोधन चालू आहे 
 
हा विषाणू कसा पसरतो आणि प्रतिबंधात्मक उपाय
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येण्यापासून हे प्रथम पसरते. तसेच, एखाद्या व्यक्तीने  खोकल्यानंतर आपल्या शरीरात शिरलेल्या बारीक कणांमुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे सरकारने दिलेल्या निर्देशात संभाषणात किमान 3 फुटाचे अंतर राखायला सांगितले आहे. तसेच मास्क देखील लावा हे सांगण्यात आले आहे. 
जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येता तेव्हा संसर्गाचा धोका वाढतो. 
वारंवार हात धुवा.- 
कोविडच्या साथीच्या रोगा पासून वाचण्यासाठी वारंवार हात धुणे आवश्यक आहे.  
 
कोविड-19 पासून संरक्षण देण्यासाठी 'मेड इन इंडिया' लस-
कोरोना विषाणू साठीची साथ जाहीर झाल्यावर जगभरात लसीवर संशोधन शास्त्रज्ञ करत आहे आणि केली आहे 
सध्या भारत, रशिया आणि इतर देशांनी ही लस दिली आहे. भारताकडून 2 लसी तयार करण्यात आल्या आहेत. कोव्हिशिल्ड लस, ही लस भारतातील सीरम इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. कोवॅक्सीन, ही लस भारत बायोटेकद्वारे तयार केली जात आहे.
 
* भारताने 65 देशांमध्ये कोरोना लस दिली आहे- 
लस तयार झाल्यावर ही 65 देशांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. तर काही देशांमध्ये ही भारताकडून अनुदानतत्वावर देण्यात येत आहे.  
श्रीलंका, भूटान, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, मालदीव यासारख्या काही देशांमध्ये भारताने 56 लाख कोरोना वॅक्सीन डोस उपलब्ध करून दिले आहे. 
सध्या कोरोना एका वर्षानंतर पुन्हा जगभरात पसरत आहे. 21 मार्च 2020 रोजी भारतात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता, आज एक वर्षानंतर पुन्हा अशीच परिस्थिती  निर्माण झाली आहे. भारतातील बर्‍याच भागात पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, अनेक भागात संपूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आले आहे.  
यावर शास्त्रज्ञांचे सतत संशोधन चालू आहे. हा रोग टाळण्यासाठी सध्या सामाजिक अंतर राखणे आणि मास्क लावणे याचे अनुसरण करा. आणि कोरोना साथीचा रोग होण्यापासून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करा.