मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 30 डिसेंबर 2020 (16:03 IST)

कंगनासोबत अनेक वर्षांपासूनचे कौटुंबीक संबंध, मनसेच्या मनीष धुरी यांचा तात्काळ खुलासा

अभिनेत्री कंगनासोबत आमचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं कौटुंबीक नातं आहे. त्याचा राजकीय संबंध जोडू नका, अशी प्रतिक्रिया मनसेचे मसल मॅन मनीष धुरी यांनी दिली आहे. याआधी कंगना रनौतसोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याने ते अडचणीत आले.  
 
मनसेचे अंबोल विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांनी काल मंगळवारी अभिनेत्री कंगना रनौत हिच्यासोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे कंगनाला शिवसेनेविरोधात बोलण्यासाठी मनसेचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चेनी जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर मनीष धुरी यांनी खुलासा केला आहे. कंगनासोबत आमचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे कौटुंबीक संबंध आहेत. त्यामुळे काल त्यांच्यासोबत देवदर्शनाला गेलो. त्याचा राजकीय संबंध जोडू नये, असं धुरी यांनी म्हटलं आहे.
 
कंगना सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी प्रभादेवीला आली होती. मराठमोळ्या वेषात आलेल्या कंगनाने यावेळी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईत राहण्यासाठी मला बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. इतर कुणाच्याही परवानगीची गरज नाही, असं कंगनाने म्हटलं होतं. कंगनाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना दोन्ही धुरी बंधू तिच्यासोबत असल्यामुळे मनसेकूडन कंगनाला छुपं संरक्षण दिलं जात असल्याची चर्चा सुरू झाली होती.