शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (15:48 IST)

ओव्हरटेक दुचाकीचा अपघात ; अडीच वर्षीय बालक जागीच ठार तर दोघे जखमी

ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीचा अपघात होऊन त्यात अडीच वर्षीय बालक जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील आणि ८ वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना रोझोदा (ता.रावेर) जवळ झाला.
 
याबाबत असे की, न्हावी (ता.यावल) येथील पाटील वाड्यातील रहिवासी तथा भुसावळ येथील एसटी आगारातील वर्कशॉप कर्मचारी खेमचंद्र मधुकर पाटील (वय ४२) यांच्या पत्नीवर शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे त्या आपल्या माहेरी रोझोदा (ता.रावेर) येथे आहेत. गुरुवारी सायंकाळी खेमचंद्र पाटील हे न्हावी येथून त्यांची दोन्ही मुले अनुक्रमे सोहम पाटील (वय ८) आणि ओम पाटील (अडीच वर्षे) या दोघांना घेऊन दुचाकीने पत्नीची भेट घेण्यासाठी निघाले.
 
दरम्यान, रोझोदा गावाच्या बाहेरच एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या एका चारचाकीने जबर धडक दिली. या अपघातात त्यांचा अडीच वर्षीय मुलगा ओम हा जागीच ठार झाला, तर खेमचंद पाटील यांच्या डोक्याला आणि मोठा मुलगा सोहम याचे कंबर व पायाला गंभीर दुखापत झाली अाहे. अपघातानंतर दोघांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलवण्यात आले. तर मृत बालक ओमवर न्हावी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
काही मिनिटांनी हुकला भेटीचा योग
रोझादा या गावी पाटील यांच्या पत्नी होत्या. काही मिनिटांनी त्यांची पत्नीसोबत आणि दोन्ही मुलांची आईसोबत भेट होणार होती. त्यामुळे ते आनंदी होते. मात्र, गावाबाहेरच अपघात घडला. त्यात अडीच वर्षीय ओम जागीच ठार झाला. आईसोबतची त्याची भेट झाली नाही. कंबर व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर दोघांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलवण्यात आले. तर मृत बालक ओमवर न्हावी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला थरार
अपघाताचा थरार रोझोदा येथील सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या कारची धडक झाली, हे त्यात दिसत आहे. याचवेळी वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याने रस्त्याच्या खाली दुचाकी नेऊन स्वत: बचाव केला हे दिसते.