बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुणे : पुलांच्या घरी पुन्हा चोरीचा प्रयत्न

पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील मालती माधव इमारतीतील लेखक पु. ल. देशपांडे यांच्या घरात पुन्हा एकदा चोरीचा प्रयत्न झाला आहे. घरात हस्तलिखिते आणि पुस्तके सोडून काहीच नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी  चोरीचा प्रयत्न झाला होता.

भांडारकर रस्त्यावरील मालती माधव इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पु. ल. देशपांडे यांचे घर आहे. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास ७ ते ८ चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून पु. ल. देशपांडेंच्या घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील सर्व सामानांची उलथापालथ केली. पण घरात किमती ऐवज नव्हता. पुलंनी लिहिलेली काही हस्तलिखिते व पुस्तकेच फ्लॅटमध्ये होती. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या इमारतीतील या फ्लॅटशिवाय आणखी तीन फ्लॅटही फोडण्यात आले.