शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (15:10 IST)

(उमंग – UMANG) अनेक सेवांचे एकत्रीकरण

यूनिफाइड मोबाइल उमंग अॅप्लीकेशन (उमंग – UMANG) यात आाधार, डिजीलॉकर यांसारख्या सेवा एकत्रितपणे दिल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे एका गोष्टीसाठी एक अॅप्लिकेशन असे करावे न लागता या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला अनेक सेवा एकत्रितपणे करता येतात. उमंग अॅप तुम्हाला आधार, ईपीएफ, आयटीआर फाइलिंग, पॅन अर्ज, डिजीलॉकर सुविधा, एनपीएस, गॅस बुकिंग, ड्रायव्हिंग लायसंस सेवा, पासपोर्ट सेवा, पेंशनसंबंधी सेवा आणि इतर अनेकविध सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणून देते. तुम्हाला तक्रार नोंदवायची असल्यास या अॅपद्वारे तुम्ही ग्राहक सेवेवर थेट तक्रार नोंदवू शकता आणि येथे लाइव्ह चॅटसुद्धा उपलब्ध आहे. याने दस्तऐवज दाखल करणे सोपे होते कारण रेकॉर्ड्स एकाच ठिकाणी ऑनलाइन अॅक्सेस करता येतात.

उमंग अॅपद्वारे यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून ईपीएफ खातेसुद्धा पाहाता येते. या अॅपद्वारे तुमचे मिळकत कर रिटर्न फायलिंगसुद्धा सोपे होते. तुम्ही पेंशन पोर्टलवर लॉग इन करून तुमची पेंशन आणि ग्रॅच्युइटीसुद्धा पाहू शकता. उमंग अॅप प्रधान मंत्री आवास योजना राबवून सर्वांसाठी घर हे शासकीय मिशन पूर्ण करण्यातसुद्धा हातभार लावीत आहे. या अॅपद्वारे पीएमएव्हायचे तपशील – अर्जाची सद्यःस्थिती, सबसिडी इत्यादीची माहिती मिळू शकते.

उमंग अॅपमध्ये भारत बिल पे सेवा उपलब्ध आहे. याने तुम्ही वीज बिल, फोन बिल भरू शकता किंवा फोन किंवा डीटीएच रिचार्ज करू शकता. ही अॅप वस्तू आणि सेवा कर नेटवर्कशी (जीएसटीएन) जोडलेली असल्यामुळे करदात्याची सत्यता लगेच तपासली जाऊ शकते.