1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: लखनऊ , मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (09:28 IST)

मोदी, शहांचे योगींनी केले अभिनंदन

narendra modi yogi
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना मोदींच्या नेतृत्वाचे हे यश असल्याचे म्हटले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन करतो. या विजयामुळे मोदींचे नेतृत्वच योग्य असल्याचे सिद्ध झाले असून, देशाच्या आर्थिक क्षेत्रातील विकासासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाला हा पाठिंबा असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हंटले आहे.
 
काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून गुजरातच्या विकासावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले हेाते. या विकासाच्या मॉडेलवर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधकांना हा मोठा धडा असल्याचा टोलाही  त्यांनी यावेळी लगावला.