सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (15:50 IST)

भाजप किती अत्यवस्थ झालेलं आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर

सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालेलं आहे. भाजप किती अत्यवस्थ झालेलं आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. जेजुरीतल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरुन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.याच सगळ्या प्रकरणावरुन जयंत पाटील यांनी पडळकरांचा समाचार घेतला.
 
सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालेलं आहे. भाजप किती अत्यवस्थ झालेलं आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, त्यांना किती फस्ट्रेशन आले आहे हे यातून स्पष्ट होते, असंही ते म्हणाले.
 
पडळकरांचं बोलणं हे सुसंस्कृत राजकारणाला शोभत नाही. ते नेहमी बेताल वक्तव्य करत असतात. पडळकरांचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती, अशा शेलक्या शब्दात जयंत पाटील यांनी पडळकरांवर हल्ला चढवला. सत्ता मिळविण्यासाठी एन-केन मार्गाने प्रयत्न सुरु असल्याचे यातून स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली.