पद्मश्री डी.वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि बिहार, त्रिपुरा तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ.दत्तात्रय यशवंतराव/ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचे मंगळवारी कोल्हापुरात त्यांच्या राहत्या घरात निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांवर उपचार सुरु होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, क्रीडा आणि इतर उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक शिक्षण संस्था स्थापित केले. त्यांना भारत सरकारने पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले.
त्यांनी राजकीय आणि सार्वजनिक जीवनात देखील महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले आणि त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राजपाल म्हणूंन जबाबदारी हाताळली. त्यांनी शिक्षण, सामाजिक विकास आणि लोकसेवा क्षेत्रातील केलेल्या कार्यांमुळे त्यांना देशभरात मान्यता मिळाली.त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
Edited By - Priya Dixit
