पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दागिने गायब
काही दिवसांपूर्वी आई कुलस्वामिनी मंदिरातून दागिने गहाळ झाले होते. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दागिने गायब झाल्याचे समोर आले आहे. अखेर कोण देवांचे दागिने चोरत आहे. हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंद समितीकडे नाही. अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
चांदीचा पान पुडा, पिकदाणी, चांदीची दांडी असलेला हात पंखा, कुंकूंची लहान वाटी, सोन्याची नथ अशा प्रकारे एकूण 315 वस्तू आहे ज्यांची नोंद समितीकडे नसल्याचे बोलले जात आहे. मात्र मंदिर समितीने दागिने गहाळ झाल्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं जात आहे. या दागिन्यांचं मुल्याकंन झाले नाही त्यामुळे त्याची नोंद समितीकडे नसल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे. .
Edited By- Priya DIxit