बा विठ्ठला, काय वर्णू महिमा मी तुझा
बा विठ्ठला , काय वर्णू महिमा मी तुझा ,
माय ही तूच, अन तूच बाप माझा,
गोडवे तुझे गावे वाटे खूप मजला,
शब्द मात्र सुचे ना, कसें आळवू मी तुजला,
हात जोडून, नतमस्तक होऊन, उभा भक्त तुझा रे,
कृपा करावी तूच, घ्यावं पदराखाली रे,
संकटी सकळा देव आठवतो, हीच रे रीत,
परी तूच मायबाप, करू नको विपरीत,
घाल पोटी अपराध सारे, दे आश्रय चरणी,
घे करवून सेवा, काय मागू मी आणि?
..अश्विनी थत्ते.