गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (09:47 IST)

पंकज भुजबळ यांनी बाळासाहेबांना आदरांजली देणारे फलक

pankaj bhujbal
शिवसेनेकडून एकीकडे जोरदार तयारी सुरू असतानाच बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली देणारे फलक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि छगन भुजबळ यांचे चिरंजीव असलेले पंकज भुजबळ यांनी माझगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये लावले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याआधी मे महिन्यात पंकज भुजबळांनी मातोश्रीवर जाऊन घेतलेली उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.   
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमधले आक्रमक नेते छगन भुजबळ नुकतेच तुरुंगातून सुटून बाहेर आले आहेत. त्यांच्या परतण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याचं एकीकडे बोललं जात असतानाच त्यांच्या शिवसेना परतीच्याही वावड्या उठू लागल्या होत्या. त्यातच छगन भुजबळ यांचे चिरंजीव अर्थात पंकज भुजबळ यांनी या वर्षी मे महिन्यात मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे या चर्चांना तर अधिकच उधाण आले.