सोमवार, 24 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (15:36 IST)

तृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना

trupti desai
शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना विमानतळावरच रोखण्यात आलं आहे. त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या निवास्थानापर्यंत नेण्यासाठी एकही टॅक्सी चालक तयार नसून त्यांना धमकवण्यात आल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. 
 
तृप्ती देसाई यांना कोची विमानतळापासून निश्चित ठिकाणापर्यंत न्यायला कोणी टॅक्सीचालक तयार नसल्याचं त्यांनी सांगितलं. टॅक्सी चालकांनी तसं केल्यास त्यांच्या वाहनाचं नुकसान करण्यात येईल असं धमकावण्यात आल्याचा आरोप देखील देसाई यांनी केला आहे. या प्रकाराबद्दल देसाई यांनी संताप व्यक्त करत आम्हाला घाबरवून परत पाठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे.