शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (17:32 IST)

गज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित

गज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. तामिळनाडूतील किनारी भागामध्ये सध्या १२० किमी प्रतितास वेगानं वारे देखील वाहत आहेत. गजच्या चक्रीवादळामध्ये मृत्यू झालेले ३ जण हे कुड्डालोर जिल्ह्यातील आहेत. सकाळी गज चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी भूसख्खलन देखील झाले. राजधानी चेन्नईपासून गज चक्रीवादळ ३०० कमी अंतरावर येऊन धडकले आहे. सहा जिल्ह्यांमध्ये ३०० रिलिफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या ४ टीम सध्या मदतीसाठी तयार असून ९००० लोक सध्या मदतकार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. दरम्यान, नेव्ही आणि हवाई दल देखील मदतीसाठी सज्ज आहे. गज चक्रीवादळामुळे रेल्वे सेवेवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला असून चेन्नई ते नागपट्टीणम, थिरूवरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात अाल्या आहेत.