1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (19:49 IST)

जेएनपीटीच्या जासई उड्डाण पुलाचा भाग कोसळला

part of jnpt
जासई नाका नजीक सुरू असलेल्या जेएनपीटीचा उड्डाण पूलावर १४ मीटर उंचीवर टाकण्यात आलेला वाय आकाराचा कॅप आज दुपारच्या सव्वाचार वाजेच्या सुमारास परातीसह अचानक कोसळला आहे. या अपघातामध्ये १ कामगार जागीच मृत्यू झाला आहे. ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
गंभीररित्या जखमी झालेल्या ६ कामगारांना जेएनपीटी आणि एमजीएम बेलापूर या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी दिली आहे.