प्रवाशांनी एसटी बसमध्येच छत्री उघडून केला प्रवास
social media
सदर व्हिडीओ पालघरच्या सफाळे आगारातील एसटीबसचा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न केले जात असून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यात सध्या मान्सूनचे आगमन झाले असून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक खोळंबली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रेल्वे वर पावसाचा परिणाम झाला असून लोकल 15 ते 20 मिनिट विलंबाने धावत आहे.
Edited by - Priya Dixit
