शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 एप्रिल 2021 (09:46 IST)

शहरातील चष्म्याची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन मधून चष्म्याच्या दुकानांना दुकाने सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचा सुधारीत आदेश पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.
 
ऑप्टीकल ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे या चष्मे विक्री करणाऱ्या संस्थेचे सचिव देवानंद लाहोरे आणि प्रतिनिधींनी 9 एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना भेटून दुकाने सुरु ठेवण्याची मागणी करणारे पत्र दिले होते.
 
ॲड. नितीन लांडगे यांनी संस्थेच्या प्रतिनिधी मंडळाला सोबत घेऊन आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन वस्तूस्थिती सांगितली कि, मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये ‘ऑप्टीकल आऊटलेट’ ला (चष्म्याची दूकाने) अत्यावश्यक सेवा म्हणून लॉकडाऊन काळात चष्म्याची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतू यावर्षी एप्रिल महिण्यापासुन ‘ब्रेक द चेन’ मध्ये या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केलेला नाही. हि आदेशातील चूक आहे. यासाठी सुधारीत आदेश आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात काढावा अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी आयुक्तांकडे केली.