बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (08:01 IST)

घरी लग्न, समारंभ करायचा आहे मग आधी घ्या प्रशासनाची परवानगी

वाढत्या कोरोनामुळे मंगल कार्यालय, लॉन आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न समारंभ व इतर समारंभाच्या आयोजनास प्रतिबंध लावण्यात आले आहे. परंतु आता घरी लग्न किंवा इतर समारंभ करायचा असेल तरी सुद्धा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गुरुवारी काढले आहेत. हे आदेश ग्रामीण भागातील नागरिकांसाठी लागू राहतील.
 
या आदेशानुसार ज्यांना आपले राहते घरी लग्न समारंभ, आयोजित करायचा असेल तर संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांनी संबंधित गट विकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी यांना तसेच नगर, पंचायत, नगरपरिषद क्षेत्रातील लोकांनी संबंधित मुख्याधिकारी याांना माहितीकरिता सूचना द्यावी. तसेच शासनाद्वारे वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.