शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (20:53 IST)

कन्हैया कुमारच्या सभेला परवानगी नाकारली

गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमार हा येणार आहे. हा कार्यक्रम कोल्हापुरातील दसरा चौकात होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी बुधवारी या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. 
 
गोविंद पानसरे यांचा शनिवारी २० फेब्रुवारीला सहावा स्मृतीदिन आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात दोन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कन्हैया कुमार यांची जाहीर सभा होणार होती. त्यासाठी पोलिसांनी बुधवारी या सभेस परवानगी दिली होती.मात्र  शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सभेला परवानगी नाकारली आहे.