शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (21:50 IST)

पिंपळे हल्ला प्रकरण, मोक्का अंतर्गत कारवाई करा

ठाण्यातील पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळेंवर एका फेरीवाल्याने केलेल्या हल्यात जबर जखमी झाल्या आहेत. पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सविस्तर माहिती देत पिंपळेंच्या हल्ला प्रकरणात मोक्का अंतर्गत  कारवाई करण्याची विनंती केली आहेच. अशा संघटित कारवायांमध्ये गुंतलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग उजेडात आणण्यासाठी या प्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी दरेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
 
राज्यात अवैध व्यवसायांना संरक्षण देणारे गुन्हेगार व भ्रष्ट अधिकारी अशा प्रकारे संघटित गुन्हेगारीची साखळी निर्माण झाली आहे. त्याचाच भाग म्हणजे ठाणे येथे घडलेला प्रकार होय. त्यामुळे केवळ हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याविरोधात कारवाई न करता अशा संघटित कारवायांमध्ये गुंतलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग उजेडात आणण्यासाठी या प्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.