शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (08:17 IST)

धुळ्यात LIC एजंटवर पोलिसांची कारवाई; तब्बल 15 कोटींची मालमत्ता जप्त

crime
धुळे  : शहरातील एका LIC एजंट कडे कोट्यवधींचं घबाड सापडल्याची माहिती समोर येतेय. धुळे पोलिसांच्या मेहनतीला मोठं यश आलं असून या एजंटकडची कोट्यवधी रुपयांची संपत्ती धुळे पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस मागच्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी 3 दिवस धाडी टाकल्या. या कारवाईमध्ये पोलिसांना 15 कोटींची मालमत्ता मिळाली आहे. आरोपी राजेंद्र बंबविरुद्ध धुळे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
 
पहिल्या दिवशी छाप्यात जवळपास कोट्यावधींची रोकड सह कोरे चेक त्याच बरोबर कोरे स्टॅम्प तसेच सोने दागिने पोलिसांच्या हाती लागले. दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन कोटी 73 लाखांची रोकड व दागिने जप्त केले आहेत. तिसऱ्या दिवशी पोलिसांनी तब्बल दहा कोटी 53 लाख रुपये जमा केले आहेत.