बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (14:11 IST)

पोलीस स्टेशन समोरील सराफा दुकाने फोडली

चित्रपटात शोभावा असा प्रसंग बीड मध्ये घडला आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल चार दुकाने दरोडा टाकत लुटली आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन समोर ही सर्व दुकाने आहेत. यामध्ये बीड मध्ये आधी  गेवराईत झालेल्या सशस्त्र दरोडा आणि हत्याकांडाचे प्रकरण घडले आहे. हे प्रकरण अवघे   २४ तास उलटले आहेत. तर लगेच   बीड तालुक्यातील नेकनूरमध्ये चोरट्यांनी पोलीस स्टेशनसमोर असलेली चार दुकानं फोडून लाखोंचा माल लंपास केला आहे त्यामुळे आता सुरक्षा करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये  दरोडेखोरांनी  नेकनूर पोलीस स्टेशनपासून फक्त  १०० फूट अंतरावरील चोरी केली आहे. दुकानांचे शटर वाकवून आत प्रवेश करीत चोरट्यानी लाखो रुपयांचा माल तसेच रोख रक्कम पळवून नेली आहे.