Dharma Sangrah
✕

धुळ्यात पाच हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक,हवालदारला पकडले

Updated: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (09:17 IST)

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात झाल्याने हे वाहन धुळ्यातील देवपूर पोलिसांनी जप्त केले होते. या किरकोळ अपघाताबाबत मोटार अपघात दाखल करुन संबंधितांचे वाहन सोडण्यासाठी देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील, हवालदार रवींद्र मोराणीस या दोघांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे संबंधित वाहन मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली. पथकाने १७ जानेवारीच्या रात्री साडेनऊ वाजता देवपूर पोलीस ठाण्यातच सापळा रचला. लाच म्हणून पाच हजार रुपये स्वीकारताना पथकाने पाटील आणि मोराणीस दोघांना रंगेहात पकडले. रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय तसेच निमशासकीय कोणत्याही कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पैसे देवू नयेत, कोणी पैसे मागितल्यास तक्रार करावी. तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त राखले जाईल, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी
केले आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: समान कामासाठी समान वेतनाच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला

जळगाव जिल्ह्यातील बोरनार गावात लग्नसमारंभात झालेल्या वादातून २३ वर्षीय तरुणाची हत्या

सोलापूरमध्ये लग्नासाठी दबाव आणि धमक्यांमुळे कंटाळलेल्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

२१ नोव्हेंबरपासून दूध महाग होणार, म्हशीच्या दुधाच्या दरात ६ आणि गाईच्या दुधाच्या दरात ४ ने वाढ

Maharashtra Weather Update: मुंबईत उकाडा, पुण्यात गारवा तर नागपुरात प्रदूषणाचा विळखा; वाचा तुमच्या शहराचा हवामान अंदाज

पुढील लेख
Show comments