शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (12:54 IST)

YouTuber goes missing प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर बेपत्ता

youtuber kavya
औरंगाबादमधील फेमस युट्युबर गर्ल बिंदास काव्या शुक्रवारपासून बेपत्ता झाली आहे. प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर बेपत्ता गेल्या काही दिवसांपासून तरुण-तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. काव्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.मित्र-कुटुंबीयांकडे तिची विचारपूस केली असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही. बिंदास काव्या कमी वयात youtube वर यशस्वी भरारी घेतली.
 
तिचे लाखो फॉलोअरर्स आहे. शुक्रवारी ती घरी परतली नसल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केला. पण तिचा काहीच पत्ता लागला नाहीअखेरीस पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
 
पण, पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. आपल्या मुलीचा लवकरात लवकर शोध लागावा अशी विनंती तिच्या पालकांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे