शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : रविवार, 4 सप्टेंबर 2022 (11:48 IST)

Ganesh Chaturthi 2022: हे 10 नैवेद्य दाखवा, बाप्पाला खुश करा

Ganesha bhog
गणेश चतुर्थी पासून 10 दिवसांसाठी देशभरात गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. या दहा दिवसात गणपतीला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे आवडते भोग अर्पण केले जातात. असे मानले जाते की गणपतीच्या कृपेने व्यक्तीला रिद्धी-सिद्धी आणि सुख-शांती मिळते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या 10 प्रकारच्या नैवेद्यांबद्दल सांगणार आहोत.
 
1) जेव्हा बाप्पाला बाप्पाचा नैवेद्य दाखवायचा वेळे येते तेव्हा तोंडावर आणि मनात देखील सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे मोदक. गणेश चतुर्थीला गणपतीला मोदक अर्पित करण्याचं खूप महत्त्व आहे.
 
2) दुसऱ्या दिवशी बाप्पाला गोड मोतीचूर लाडू अर्पण करा. या दिवशी गणपतीची बाल रुपात पूजा करुन मोतीचूरचे लाडू अर्पण करा.
 
3) स्वादिष्ट घरगुती बेसनाचे लाडूही बाप्पाला अर्पण करता येतात. प्रसाद म्हणून बनवलेले बेसनचे लाडू घरातील सर्वांनाही आवडतील.
 
4) पूजेच्या चौथ्या दिवशी बाप्पाला फळांचा नैवेद्य दाखवावा. आपण यात केळी देखील अर्पित करु शकता.
 
5) गणपतीच्या नैवेद्यासाठी स्वादिष्ट मकाण्याची खीर तयार करावी. 
 
6) पूजेच्या सहाव्या दिवशी नारळ अर्पण करा. नारळाच्या नैवेद्याने गणपती नक्कीच प्रसन्न होतील.
 
7) घरी बनवलेल्या प्रसादाची चव वेगळीच असते. अशात एक दिवस आपण ड्रायफ्रूट्सच्या लाडवांचा नैवेद्य दाखवू शकता.
 
8) दुधापासून बनवलेला कलाकंद बाप्पाला नक्कीच आवडेल. तुम्ही 10 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी परमेश्वराला कलाकंद अपिर्त करा.
 
9) घरी केशर घालून तयार केलेले श्रीखंड बाप्पाला नक्कीच आवडेल.
 
10) शेवटच्या दिवशी तुम्ही बाप्पासाठी विविध मिष्ठान जसे लाडू, मोदक, खिरापत इतर नैवेद्य दाखवू शकता.