Paan Modak recipe : गणपती बाप्पाला पान मोदक नैवेद्याला द्या रेसिपी जाणून घ्या
गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त 10 दिवस गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण करतात.गणपती बाप्पाना सर्वात जास्त प्रिय असलेल्या मोदकांचा नैवेद्य अर्पण करतात.जरी मोदकाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, परंतु आज आम्ही एका वेगळ्या प्रकारच्या नागलीच्या पानाच्या मोदकाची रेसिपी सांगत आहोत, नैवेद्यासाठी पान मोदक बनवायचे असतील तर त्यासाठी नागलीची पाने, नारळाचा किस, साखर, दूध, सुका मेवा, गुलकंद इत्यादींचा वापर केला जातो.चला जाणून घेऊया साहित्य आणि कृती.
साहित्य-
अर्धा कप कंडेन्स्ड दूध
1 कप सुके नारळ -
5 नागलीची पाने
4 चमचे गुलकंद -
1/4 कप चिरलेले काजू आणि बदाम
1 टीस्पून साजूक तूप
साहित्य -
सर्वप्रथम नागलीची पाने आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र बारीक करून घ्या नंतर तुपात नारळ कमीत कमी 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर परतून घ्या.आता त्यात पानांचे मिश्रण घाला आणि नीट ढवळून घ्या.घट्ट झाल्यावर गॅस बंद करून थंड होऊ द्या.
आता ड्रायफ्रुट्स आणि गुलकंद एकत्र मिक्स करून स्टफिंग तयार करा.हाताला साजूक तूप लावून मिश्रण हाताने दाबून पारी बनवा .ही पारी थोडी जाडसर बनवा. आता पारीमध्ये गुलकंद टाकून त्याला गोल आकार द्या.आता मोदक साच्यात ठेवून प्लेटमध्ये ठेवा.पान मोदकांचा नैवेद्य बाप्पांसाठी तयार आहे.