शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated: शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (19:50 IST)

4 वर्षांच्या चिमुकलीचा विजेचा शाॅक लागून दुर्देवी मृत्यू

नाशिकच्या सिडकोतील त्रिमूर्ती चौक उंटवाडी रोड येथे एका दुकानात आईस्क्रीम खायला गेली असता एका चार वर्षाच्या चिमुकलीचा फ्रीजच्या वायरचा शॉक लागून तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ग्रीष्मा विशाल कुलकर्णी(4) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. ग्रीष्मा ही आपल्या वडिलांसह घराजवळच्या दुकानात आईस्क्रीम खाण्यासाठी गेली असता ग्रीष्माला फ्रिजच्या वायरचा शॉक लागला आणि ती बेशुद्ध पडली.तिला बेशुद्ध पडलेले पाहून तिच्या वडिलांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृतघोषित केले. हे ऐकून तिचा वडिलांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे.