गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (08:23 IST)

बेस्ट वीज ग्राहकांसाठी ‘डिजिटल’सुविधा पुरवताना आता वीज बिल भरण्यासाठी बेस्टची ‘क्यू आर कोड’ सेवा उपलब्ध

best
बेस्ट उपक्रमाने आपल्या वीज ग्राहकांसाठी ‘डिजिटल’सुविधा पुरवताना आता वीज बिल भरण्यासाठी बेस्टची ‘क्यू आर कोड’सेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे बेस्टच्या दहा लाखांपेक्षाही जास्त वीज ग्राहकांना वीज बिल भरणे अधिक सुलभ होणार असून त्यांच्या वेळेतही बचत होणार आहे. बेस्टच्या वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी बेस्ट उपक्रम व टीजेएसबी बँकेने मिळून ही ‘क्यू आर कोड’सेवा उपलब्ध केली आहे.
 
डिजिटल पेमेंटचा वापरात वाढ होणार!
सध्या डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या ७० टक्क्यांपर्यंत गेली आहे. पुढील वर्षभरात ८० टक्के पेक्षा जास्त डिजिटल पेमेंट होऊ शकते. उपक्रमातर्फे स्मार्ट मीटरची व्यवस्था करण्यात येणार आहे.यासंदर्भातील माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
 
गुरुवारी कुलाबा येथील बेस्ट भवन मुख्यालयातील बस आगारात ‘क्यू आर कोड’ सेवा उपलब्ध करण्याबाबतचा कार्यक्रम सायंकाळी उशिराने पार पडला. याप्रसंगी बोलताना लोकेश चंद्र यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली. बेस्टचे सध्या साडे दहा लाखांपेक्षा अधिक वीज ग्राहक आहेत. वीज बिल पेमेंटचा वेळ कमी करण्याच्या कामी क्यूआर कोडचा निश्चित उपयोग होईल.