सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 एप्रिल 2022 (08:27 IST)

वीज संकट गंभीर, कोळसा पुरवठ्यासाठी रेल्वेच्या 753 फेऱ्या रद्द

indian railway
भारतातील कोळशाचा साठा कमी असल्यानं वीज संकट गंभीर होत चाललं आहे. त्यामुळे देशभरात वेळेवर कोळसा पुरवठा व्हावा म्हणून भारतीय रेल्वेनं पुढाकार घेतला असून, 42 रेल्वेगाड्यांच्या 753 फेऱ्या रद्द केल्या आणि कोळसा वाहतुकीस प्राधान्य दिलं.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या (SECR) 713 रेल्वे फेऱ्या 25 मे पर्यंत, तर उत्तर रेल्वेच्या (NR) 40 फेऱ्या 8 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
 
छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश आणि झारखंड या चार कोळसा उत्पादक राज्यांमधील रेल्वेप्रवाशांना याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे.
 
महाराष्ट्र, पंजाब, झारखंड, बिहार, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश ही राज्यं प्रामुख्यानं कोळसा तुटवड्यामुळे वीज संकटाचा सामना करत आहेत.