1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (22:33 IST)

प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं पाठवली थेट ‘कृष्णकुंज’वर; वाद चिघळणार?

Prabodhankar Thackeray's books sent directly to 'Krishnakunj'; Will the argument simmer? Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
मागील काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात वाद उफाळला आहे. यावरून मनसे पदाधिकारी आणि संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यात आरोपप्रत्यारोप दिसून आले. मात्र सध्या संभाजी ब्रिगेडकडून आता मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके पाठवली आहेत. ही पुस्तके राज ठाकरे  यांना पोस्टाने पाठवण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर मनसे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात आता वाद वाढण्याची शक्यता आहे.राज ठाकरे यांच्या विधानावरून अनेक आरोपप्रत्यारोपाच्या झडी उठल्या गेल्या आहे.मनसेचे नेते वसंत मोरे यांनी प्रवीण गायकवाड यांनी धमकी दिली होती.
 
आता राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं’ ‘खरा ब्राम्हण’ आदी पुस्तकंच राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवास्थानी कृष्णकुंजवर  पाठवण्यात आली आहे.दरम्यान, ‘राज ठाकरे यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही.

तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही.राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याची जोरदार प्रविण गायकवाड यांनी केली होती.