सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (21:47 IST)

प्रकाश आंबेडकर 1 मे ला शांती मार्च काढणार

prakash ambedkar
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 1 मे रोजी शांती मार्च काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मनसे, भाजपा आणि राज्य सरकारची भूमिका पाहता, ३ मेला राज्यात काहीही घडू शकतं, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आम्ही शांती मार्च काढणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. तसेच या मार्चमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला थारा नसून विविध संघटनेचं स्वागत केलं जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.