शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (10:13 IST)

Prasad Lad :माझ्या जीवाला धोका, भाजप नेते प्रसाद लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Prasad Lad
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. एक अनोळखी व्यक्ती पाळत ठेऊन अनिल गायकवाड नावाच्या व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे पात्रात सांगितलं आहे. तसेच त्यांनी एक पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना देखील लिहिले आहे. 
 
काय लिहिले आहे पत्रात -
भाजपचे नेते आमदार आणि उद्योजक प्रसाद लाड यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. अनिल गायकवाड नावाची व्यक्ती जीवे मारण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करत असल्याचे पत्रात लिहिले आहे. ते म्हणाले, मला मिळालेल्या पत्रानुसार, या पात्रात राहुल कंडागळे यांच्या माहितीनुसार, मला जीवे मारण्यासाठी अनिल गायकवाड विविध मार्ग अवलंबवत आहे. आणि माझ्या घरावर आणि ऑफिसवर अनोळखी व्यक्ती पाळत  ठेवल्याचे सांगितले आहे. लाड यांनी या प्रकरणाची दखल गांभीर्याने घेण्याची मागणी केली आहे. 
 

Edited by - Priya Dixit