संबंधित माहिती
- गर्भवती पत्नीला जिवंत पेटवले, पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत
- आजी आणि मामीला घाबरवण्यासाठी गंमत करताना 12 वर्षीय मुलाचा आगीत जळून मृत्यू
- नवरा बायको जोक: दिवाळी पर्यंत मद्यपान अजिबात नको
- धक्कादायक ! मित्राच्या पत्नीची अश्लील छायाचित्रे बनवणारा होमगार्ड ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण
- हृदयद्रावक ! पत्नीच्या गळा आवळून खून करून पतीची आत्महत्या
ठाण्यात गर्भवती पत्नीला जिवंत जाळले
ठाण्यातील एका तरुणाने आपल्या गर्भवती पत्नीला जिवंत पेटवलं आहे. या भयावह घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत झाला आहे. पीडितेवर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास कळवा पोलीस करत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अनिल चौरासिया असं अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपी पतीचं नाव असून तो कळवा परिसरातील रहिवासी आहे. आरोपी अनिल आणि त्याची जखमी पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी अनिल याने अन्य एका तरुणीसोबत विवाह केल्याचा संशय जखमी पत्नीला होता. त्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. दरम्यान, 30 ऑक्टोबर रोजी दोघांत पुन्हा एकदा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या पतीने गर्भवती पत्नीवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं आहे. पीडित महिला सहा महिन्यांची गर्भवती असूनही आरोपीने तिच्यासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपी पतीने रॉकेल टाकून पेटवल्याने पीडित महिला गंभीररित्या भाजली होती. या धक्कादायक घटनेनंतर शेजाऱ्यांनी जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
मुंबईतील जे जे रुग्णालयात जखमी महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, पीडित महिलेचं संपूर्ण शरीर भाजल्यामुळे तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी आरोपी पतीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 1 नोव्हेंबर रोजी कळवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
