शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंबागाद , शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (09:10 IST)

74 व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन विशेष

मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये 17 सप्टेंबर अर्थात 74 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने जय्यत तयारी सुरु आहे. या दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांची उपस्थिती राहिल. उद्या सकाळी 9 वाजता सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या स्मृती स्तंभाजवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री शहरातील इतर नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहतील. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्याची मुख्य प्रशासकीय इमारत अर्थात विभागीय आयुक्तालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 
 
पोलिस बंदोबस्त
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरातील विमानतळ, बाबा पेट्रोलपंप, सिद्धार्थ उद्यान, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आदी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.  
 
200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन करतील. सकाळी 9.25 वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कार्यक्रम स्थळी 400 च्या जवळपास खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या किंवा आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच या कार्यक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. वीस हजार चौरस फुटाच्या मंडपाची उभारणी केली असली तरी 200 लोकांनाच कार्यक्रमात उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे.