सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राष्ट्रपती निवडणूक : शिवसेना आज निर्णय घेणार

राष्ट्रपतीपदावर मतांचे राजकारण नव्हे तर देशाचे भले करणारा उमेदवार दिल्यास आमचा भाजपला पाठिंबा असेल असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा करता येत नसेल तर समान नागरी कायदा कसा करणार असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. हा देश हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते. तर त्या नावावर सहमती होत नसेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव सांगितले होते. 
 
पण भाजपाने दलित मतांवर डोळा ठेवून भाजपाने दलित उमेदवार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत मंगळवारी  होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी  स्पष्ट केले आहे.  शिवसेनेचा ५१ वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी पार पडला. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.