गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2018 (09:59 IST)

खरेदीचा विक्रम : तब्बल २ लाख ४१ हजारांची म्हशीची जोडी

जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या नेवासातील घोडेगावयेथील आठवडे बाजारात शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली. या दोन म्हशी औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव येथील बागायतदार एकनाथ साळे यांनी खरेदी केल्या. बाजारातील अलीकडील हा विक्रम समजला जातो.

देशभरातून घोडेगावच्या म्हशीच्या बाजारात जातिवंत म्हशींची खरेदी व विक्री होते. म्हसाण, मु-हा, जाफराबादी, गावरान, पंढरपुरी अशा म्हशींच्या जाती खरेदी-विक्रीसाठी येतात. शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीचा खरेदी-विक्रीचा उच्चांक मोडला गेला. म्हशीच्या बाजारातील जुने जाणते नाव असलेले कै. बबनराव बर्डे यांचे चिरंजीव रवींद्र बर्डे यांच्या दावणीवरून म्हसाण जातीच्या दोन म्हशींची विक्री झाली.