लाच स्वीकारताना खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात
सोलापूर : खासगी वकीलास २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दयानंद मल्लिकार्जुन माळी रा. माळीवस्ती, सोरेगाव, विजापूर रोड, सोलापूर असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्यात आलेल्या खासगी वकीलाचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचे विरुध्द सह निबंधक को ऑप सोसायटी पुणे यांचे न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी चालु आहे. सदर केसचे निकाल तक्रारदार यांच्याबाजूने लावण्यासाठी व निकालपत्रासाठी सह निबंधक को ऑप सोसायटी पुणे येथील क्लार्क यांना ५० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगुन यातील आरोपी तक्रारदार यांचे वकील दयानंद मल्लिकार्जुन माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे सह निबंधक को ऑप सोसायटी यांचे न्यायालयातील क्लार्क यांना देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करीत असलेबाबात अॅन्टी करप्शन ब्यूरो. सोलापूरकडे तक्रार प्राप्त झाली होती.
सदर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि.०७.१२.२०२३ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील खाजगी वकील दयानंद मल्लिकार्जुन माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याविरूध्द सह निबंध को ऑप सोसायटी पुणे यांचे न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करून घेण्यासाठी तेथील क्लार्क यांना ५० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून यापूर्वी घेतलेले ५ हजार रुपये वजा करून उर्वरित ४५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील दुसरा हप्ता २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणी खाजगी वकील दयानंद मल्लिकार्जुन माळी यांच्या विरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार सोनवणे, पोलीस अंमलदार पकाले,पोलीस अंमलदार हाटखिळे,पोलीस अंमलदार किनगी,पोलीस अंमलदार सुरवसे आदींनी केली आहे.