रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जून 2018 (17:27 IST)

औरंगाबादचा समाधान दौड पीएसआय परीक्षेत राज्यात पहिला

नुकतेच एमपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून या निकालांमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी अभ्यासिकेतील समाधान किसनराव दौड या विद्यार्थ्याने पीएसआय परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. मागील चार वर्षांपासून सिल्लोडचा समाधान दौड राष्ट्रवादी विद्यार्थी अभ्यासिकेत नियमित अभ्यास करीत होता. समाधानच्या जिद्द आणि मेहनतीला राष्ट्रवादी विद्यार्थी अभ्यासिकेने हातभार लावला आणि समाधानला हे यश संपादित करता आले.
 
राष्ट्रवादी विद्यार्थी अभ्यासिकेत मला भरपूर सुविधा लाभल्या, विविध वृत्तपत्रे, पुस्तके वाचण्यास मिळाली, खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या राष्ट्रवादी विद्यार्थी अभ्यासिकेमुळेच मला हे घवघवीत यश मिळवता आले. ग्रामीण भागातील, उपेक्षित घटकांतील, जनसामान्यांतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चांगला उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार मानतो अशी भावना समाधान दौड याने व्यक्त केली.